Logo

महान कलावंत

व्ही. शांताराम

स्त्रीपार्टीनट म्हणूनच बालगंधर्वांकडे बघत असावेत. पण गंधर्वांच्या अभिनयाचे सामर्थ्य किती अफाट आहे याचा अनुभव मी घेतला होता. त्यामुळेच ते कुठलीही भूमिका विलक्षण प्रभावी करतील याची मला खात्री होती. ‘धर्मात्मा’ चित्रपटात एकनाथाची व्यक्तिरेखा अत्यंत उत्कृष्टपणे रंगवून नारायणरावांनी आपल्या अभिनयाने माझ्या खात्रीवर शिक्कामोर्तब केले. मुंबईत आणि मुंबईबाहेरही हा चित्रपट चांगलाच यशस्वी झाला.

नाटकातली त्यांची बराच वेळ चालणारी गाणी ऐकणाऱ्यांना ‘धर्मात्मा’ चित्रपटातील त्यांची काही मिनिटांचीच गाणी ऐकून पूर्ण समाधान मिळाले नसेल कदाचित. पण त्यांच्या स्वरांतच नाट्य आणि वातावरण निर्माण करण्याची जबरदस्त ताकद होती. ‘धर्मात्मा’मध्ये एका प्रसंगात वासंती नाचत गाणे म्हणत येते आणि त्यावेळी एकनाथ फक्त सुरांनी तिला साथ देतात. ते सूर आठवले की आजही माझ्या अंगावर रोमांच उभे राहतात. नारायणरावांच्या गळ्यातून बाहेर पडलेले ते सूर मी कधीच विसरणे शक्य नाही. गाण्याचा प्रभाव हे ते गाणं किती वेळ चालतं यावर अवलंबून असतं असं मला वाटत नाही.

‘धर्मात्मा’ नंतर मला बालगंधर्वांना तुकारामाच्या भूमिकेत पडद्यावर आणायचे होते. पण स्त्री भूमिकेतच पडद्यावर येण्याचा आग्रह नारायणरावांनी धरल्यामुळे आणि तसे करणे म्हणजे कलेवर अत्याचार होईल अशी माझी धारणा असल्यामुळे आम्ही अगदी दिलखुलासपणे करारातून मुक्त झालो.

शब्दांकन – कमलाकर नाडकर्णी

Scroll to Top