जोहार मायबाप जोहार
पु. ल. देशपांडे
काही नावं जादूच्या मंत्रांसारखी असतात. महाराष्ट्रात शिवाजी, टिळक आणि बालगंधर्व ही तीन नावं अशीच मंत्रांसारखी आहेत. नावांचा उच्चार केला किंवा ते नाव नुसतं कानी पडलं तरी क्षणार्धात जादूचं झाड फुलून यावं तसं मराठी मन फुलून येतं. किंवा जे मन असं फुलून येतं त्याला मराठी मन म्हणावं असं मानायलाही हरकत नाही. चिकित्सा, तर्क, विश्लेषण ह्या कसोट्यांच्या पलीकडे गेलेली ही विभूतिमत्त्वं. उपास्य दैवताविषयी बोलण्याचा जसा उपासकाला कधी कंटाळा येत नाही, तसा ह्या लोकोत्तर पुरुषांविषयी बोलताना मराठी माणूस कधी कंटाळत नाही. तसं पाहिलं तर जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात उत्तुंग शिखरांसारखी ठरलेली थोर माणसं महाराष्ट्रात काही कमी झाली नाहीत. ही यादी विष्णुसहस्त्रनामाइतकी मोठी नसली तरी संध्येतल्या चोवीस नावांइतकी प्रातःस्मरणीय नावं निश्चितपणे घेता येतील. ती नावं मनात आदरभाव उत्पन्न करतात. कृतज्ञता जागी करतात – नतमस्तक करतात. पण शिवाजी, टिळक आणि बालगंधर्व म्हटल्यावर मराठी मनाच्या तरफा एकदम झंकारतात – आतली सतार सुरांची पखरण करायला लागते.
वास्तविक ह्या तिघांच्याही कर्तृत्वाची प्रत आणि क्षेत्रं निराळी. पण इथे प्रश्न परस्परांच्या तुलनेचा नाही आपल्या गुणांनी असंख्यांच्या अंतःकरणात घर करून असण्याचा आहे. असाच एक असंख्य मराठी मनांच्या गुहागुहात नुसत्या नामोच्चाराने चांदणे पसरवणारा जादूगार म्हणजे बालगंधर्व.
सुंदर संदर्भ
छत्रपती किंवा लोकमान्यांचे पोवाडे गायला तोफांचे चौघडेच हवेत, पण बालगंधर्वांचे पवाडे गाण्याचं काम असंख्य गळ्यातून उमटणाऱ्या बागेश्री, भीमपलास, यमन, पिलू, पहाडी, तिलक कामोद, मांड, खमाज, काफी सिंदुरा ह्या रागरागिण्यांनी ऐंशी नब्बद वर्षे चालवलेलं आहे. शिवछत्रपतींच्या शिक्क्यावर जशी ‘मुद्राभदायराजते’ अशी अक्षरं असत तशी ह्या रागरागिण्यांवर ‘बालगंधर्व’ ही मुद्रा विराजमान झालेली आहे. किंबहुना हे राग ऐकताना बालगंधर्वांच्या ढंगाची जागा गायकगायिकेच्या गळ्यातून गेली नाही तर त्या स्वरमूर्तीला उराउरी भेटल्यासारखे वाटत नाही. आणि अशी भेट झाली म्हणजे तो आनंद कुणाला सांगू आणि कुणाला नको असे होऊन जाते. बालगंधर्व हा विषय त्यांच्या गायनाचा आणि अभिनयाचा संस्कार झालेल्या माणसाला बोलून संपला असे कधी वाटतच नाही. आपल्याकडून लिहिण्याबोलण्याची पुनरावृत्ती तर होत नाही ना याची मनाला धास्तीही वाटत नाही. एखादा आवडता राग किंवा गीत आयुष्यभर गात राहिलं तरी ती पुनरावृत्ती वाटत नाही. तसाच हा विषय ! मला एक गोष्ट आठवते. शकूरखाँ नावाचे फार चांगले सारंगिये होते. त्यांनी आयुष्यभर सारंगीवर पूरियाधनाश्रीची आराधना केली. कुणीतरी त्यांना विचारलं, ‘खाँसाहेब तुम्ही नेहमी पूरियाधनाश्रीच का वाजवता?” खाँसाहेब म्हणाले, “कारण तो अजून वाजवून संपलाय असं वाटत नाही म्हणून”. ‘बालगंधर्व हा रागही शकूर खाँच्या पूरियाधनाश्रीसारखा कितीही बोलले-लिहिले तरी संपतच नाही. सत्तर-पंचाहत्तर वर्षांपूर्वी ध्वनिमुद्रित केलेलं तबकडीवरचं गाणं आजही ऐकताना आयुष्यात शेकडो वेळा गेलेली दाद पुन्हा त्याच आनंदाने केव्हा गेली हे कळण्यापूर्वी गेलेली असते. त्यातली नव्यता त्यानंतर संगीताचे वर्षानुवर्ष इतके संस्कार होऊनही जरासुद्धा कमी होत नाही. इतकंच कशाला प्रत्यक्ष रेकॉर्ड वाजत नसली तरी त्यांचेच एखादे गाणे मनात जागे होते आणि ‘सुख झाले हो साजणी’ अशी अवस्था होते. भूतकाळातल्या अशा काही लक्षणीय स्मृती मनात जागत असतात म्हणूनच आपण प्रगल्भ होत असतो. त्या स्मृती साहित्य-संगीत-शिल्प-चित्र अशा क्षेत्रातल्या असल्या तर मग विचारायलाच नको. मिलान कुंदेरा नावाच्या प्रसिद्ध चेक् साहित्यकाराने म्हटलं आहे, ‘Without a past we are all children. To be grown up is to have a memory! जीवनाची पाळंमुळं अशी भूतकाळात रुजलेली नसतील तर सारं जीवनच संदर्भहीन होईल. शेवटी मानवी संस्कृती म्हणजे अशा अनंत संदर्भाचा समुच्चय. बालगंधर्व हा रसिक मराठी मनाला गवसलेला, जीवन समृद्ध करणारा सुंदर संदर्भ आहे. आज जगत असतांना भूतकाळातला तो संदर्भ स्मरत राहाण्याने बिघडत नाही. सुसंस्कृत माणूस म्हणून जगणे ह्याचा अर्थ ही आल्हादायक संस्मरणे जोपासत जगणे असाच आहे. ज्यांनी जीवनात आपल्याला कुठल्याही प्रकारचा का होईना पण आनंद दिला त्याची आठवण ठेवून जगायला मनात कृतज्ञता असावी लागते. हा केवळ ‘नॉस्टाल्जिया’ किंवा स्मृतिविलास नव्हे. ज्यांना अशा रमून जाण्यासारख्या स्मृतीच लाभल्या नाहीत त्यांना हे भूतकाळाचे विलासी आकर्षण वाटले तर त्याला इलाज नाही.
गीता संपताना संजय म्हणाला आहे- “तच्च संस्मृत्य संस्मृत्य रुपमत्यद्भुतम् हरेः । विस्मयो में महान् राजन् हृष्यामिच पुनः पुनः ।। ” श्रीहरीचं ते अत्यद्भुत रूप आठवून आठवून पुन्हा पुन्हा हर्षित होण्याच्या अनुभवाचा संजयाला विस्मय वाटत होता. आपलं हे असं का होतं हे त्याचं त्याला कळत नव्हतं. बालगंधर्व ज्याच्या मनी सुरातून किंवा आणि अभिनयातून झिरपत गेले त्यांचीही, ती नाटक आणि गाणी आठवून आठवून संज्यासारखीच अवस्था होते. अशी का होते याची कारणं आयुष्यभर शोधूनही हमखासपणाने सापडली असं म्हणता येत नाही. चांदण्यातलं नेमकं सुंदर काय? समुद्रातल्या भरतीत सौंदर्य नेमकं कुठे दडलं आहे? ह्या प्रश्नांची उत्तरं जशी शोधीत राहाण्याचाच मजा घेत जगायचे तीच गत ‘बालगंधर्व’ ह्या आनंदनिधानाच्या बाबतीत आहे. त्यांच्या अद्वितीयत्वाचा शोध घेताना कुणी काही, कुणी काही उपपत्ती लावीत असतात. चर्चेतून, भाषणातून, लेखातून मांडीत असतात पण इतकं सांगूनही आपलं उत्तर पैकीच्या पैकी मार्काचं वाटत नाही. ‘नेतिनेति’ असंच म्हणावं लागतं. पडदा वर गेल्यापासून बालगंधर्वांची पहिली एंट्री होईपर्यंतचा प्रत्येक क्षण नाट्यगृहातल्या प्रेक्षकांना उसासारखा का वाटायचा? आणि एकदा ती एंट्री आली की ‘बरं झालं’ म्हणणारी जणू त्या चाक्षुष यज्ञाची देवता संपल्याला प्रसन्न झाली असा भास त्या रसिकश्रेष्ठांना व्हायचा? ह्याची काय उत्तर देणार? अलीकडच्या रेडिओसाठी सुप्रसिद्ध अभिनेत्री दुर्गाबाईची मी मुलाखत घेत होतो. मी त्यांना बालगंधर्वांविषयी विचारलं, त्या म्हणाल्या, “एकदा बालगंधर्व स्टेजवर आले की त्यांच्यावरची आपली नजर कुठेही हलवू नये असं वाटतं. त्यांच्या गाण्याचं बोलणंही ऐकत राहावं असं वाटतं.” केवळ दुर्गाबाईंचाच नाही त्या काळातल्या संगिनींचीही ही अवस्था. बालगंधर्वांना पाहताच गळे नयनी जमले’ असंच होऊन जायचं.
हा अनुभव झाला प्रेक्षकांचा. त्यांच्याबरोबर भूमिका करणारे गंधर्व पंक्तीतले नटिवर्य माधवराव वालावलकर एकदा मला म्हणाले “आमच्या नाटकांना तिकीट काढणाऱ्या पत्रकोव्या रुपयातले चौसष्टच्या चौसष्ट पैसे बालगंधर्वासाठी होत. त्यातला एक पैसाही इतर कुणाला पाहण्यासाठी नव्हता.” नाट्यविद्येतल्या घटकांची चर्चा करणाऱ्या पंडितांना किंवा आस्वादयर्जित समीक्षेला श्रेष्ठ मानणाऱ्या महापंडितांना नाटक हे अंगण असणं मंजूर नाही. पण ज्यांनी गंधर्वांना सभामंडपातून गाभाऱ्यातल्या मूर्तीचं दर्शन घ्यावं भावनेनं पाहिली आणि गंधर्वांचं गायन आणि अभिनय ल्ह्याचा प्रसादासारखा स्वीकार करून स्वतःला धन्य मानलं ते आपण सामान्य आहोत हे किती बरं आहे असंच मानतील.
जिंदगीची जीवघेणी हालचाल
विलक्षण भक्तिभावाने ओथंबलेल्या हया कलावंताने नाट्यकलेच्या चरणी देह जावो अथवा राहो ह्या दृढ भावनेने आपलं आयुष्य वाहिलं. ज्यांना ‘अन्नदाते मायबाप’ म्हटलं त्या प्रेक्षकांपुढे एखाद्या देवतेची मूर्ती मखरात ठेवावी अशा श्रद्धेने एकेक नाट्यकृती सजीव करून ठेवली ती देखील महापूजा बांधावी अशा भरजरी थाटात. ती महापूजा भक्ताच्याच भावनेने त्या काळातल्या प्रेक्षकांनी पाहिली. एवढंच काय पण एका पुरुषाला सिंधू, रुक्मिणी, सुभद्रा, मेनका, रेवती अशा स्त्री वेषात येऊन मोहिनी टाकताना पाहणाऱ्या स्त्रियांनीदेखील अंजोळ अभिनय कलेतून आणि सौंदर्यातून घडलेलं हे नयनमनोहर ‘स्त्री-दर्शन’ नुसतं मान्यच केलं नाही तर अनुकरणीय ठरवलं. स्त्रीच्या सुभगातल्या सुभग दर्शनाचा आदर्श बालगंधर्व नावाचा पुरुष ठरला. नाथांच्या घरची ही उलटी खूण. पाण्याला तहान लागावी तशी स्त्रियांना बालगंधर्वांनी उभी केलेली भामिनी, रुक्मिणी, मेनका पाहाण्याची ओढ लागली. आरशापुढे साजशृंगार करणाऱ्या तत्कालीन असंख्य युवतींनी हळूच आपल्या त्या दर्पणाला निश्चित विचारले असेल की “सांग दर्पणा, दिसते का मी बालगंधर्वांसारखी ?” आपल्या पतीला ‘नयने लाजवीत’ सारखं नाटकातलं पद ऐकवताना निश्चित गायलं असेल. आणि ही लोकप्रियता रेडिओ, सिनेमा, टेलिव्हिजन यांसारखी जगडव्याळ प्रसार माध्यमं येण्याआधीच्या काळात, मला वाटतं, हा चमत्कार फक्त महाराष्ट्रातच घडला. त्यांना किर्लोस्कर, देवल, गडकरी, खाडिलकर यांच्यासारखे नाटककार लाभले, गोविंदराव टेंबे, भास्करबुवा बखले यांच्यासारखे गायनगुरू लाभले, अभिनयाचे धडे दिले ते देवल, खाडिलकर ह्या खुद्द नाटककारांनी आणि सर्वात मोठा चमत्कार म्हणजे ज्या अजोड भक्तिभावाने हा कलावंत आपल्या नाट्यगुरू आणि गायनगुरूंपुढे गेला त्याच भक्तिभावाचं संक्रमण त्याने प्रेक्षकांमध्ये केलं.
नारायणरावांचा अभिनय कसा होतो हे ठरवण्यापेक्षा नारायणराव बालगंधर्व रंगमंचावर नाना भूमिका करताना जसे वावरतात, जसे बोलतात, जसे गातात त्याला अभिनय आणि संगीत म्हणावे अशा भक्तिभावाने प्रेक्षक त्यांची नाटकं पाहू लागले. एखाद्या कारंजाचे तुषार नर्तन पाहावे तसे बालगंधर्वांचे स्वरनर्तन पाहू लागले. ह्या अमृतानुभवाचा आस्वाद आनंदाने घेणारे अल्लादियाखाँसाहेबांसारखे बालगंधर्वांच्या गुरूंचे गुरू होते आणि त्या गायनाचा शास्त्रीय अन्वयार्थ न कळणारे सामान्य श्रोतेही होते. ते इंद्रधनुष्यासारखे नानारंगी भावदर्शन काय आणि त्या त्या भावाला अनुकूल असे बोलणे काय आणि गाणे काय! विद्वानांची पगडी आणि सामान्यांचं अंतःकरण एकदम हलवण्याची ताकद असलेला तो कलाविष्कार. हे तर संतसाहित्याचं व्यवच्छेदक लक्षण आहे. वरपांगी साध्या मराठीमोळ्या भाषेतला अभंग जरा जाणत्या नजरेने निरखून पाहिला की त्या मागे दडलेली वेदोपनिषदं दिसायला लागतात. त्याप्रमाणे हे साधे वाटणारे गंधर्वांचे गाणे अभिजात रागसंगीताची जाणकारी असलेल्या श्रोत्यांना आपले कुळशील किती थोर आहे याची साक्ष पटवून जायचे. मान हलता हलता हातही जोडले जायचे. अशा ह्या अनेकांच्या मानसीच्या राजहंसाची यंदा जन्मशताब्दी. २६ जून हा त्यांचा शंभरावा जन्मदिन.
परमानंदाचे धनी
विशीपंचविशीतले गाण्याची नजर लाभलेले तरुण गायक आणि गायिका त्या जुन्या ध्वनिमुद्रिकांतून बालगंधर्वांच्या गायकीतल्या सौंदर्याचा साक्षात्कार आपल्या गळ्यातून श्रोत्यांना घडवावा यासाठी आटोकाट प्रयत्न करताना दिसताहेत. जिच्या मॉड वेशभूषेमुळे आणि छाटलेल्या केसामुळे ती पॉप गायिका असावी असे सकृतदर्शनी वाटावे अशी भारतीय अभिजात संगीताच्या जादूने भारावलेली अत्याधुनिक तरुणी बालगंधर्वांच्या तबकडीवरच्या गाण्यातल्या सुरलयीच्या अलगदपणाने चाललेल्या लीलेमुळे हरखून जाऊन त्यातल्या जागा आपल्या गळ्यावर नेमकेपणाने चढाव्या म्हणून धडपडताना मी पाहिली आहे. मराठी नाट्यसंगीताचा अजिबात संस्कार नसलेली एक तरुण प्रतिभावान अभिजात संगीत गाणारी गायिका मला म्हणाली होती, “गाण्याला सुरुवात केल्याक्षणी सगळ्या रागाचा सुगंध धूपासारखा इतक्या सहजपणाने दरवळायला लावायचं असं सामर्थ्य ख्याल गायकांत देखील आढळणं मुष्किल असतं.” ज्ञानेश्वरीविषयी ‘एक तरी ओवी अनुभवावी’ असं म्हटलं आहे. बालगंधर्वांची गाणी विश्लेषणाची सारी बौद्धिक हत्यारं क्षणभर बाजूला ठेवून सुगंधासारखी प्रथम अनुभवात यायला हवी. तो सुगंध आपल्याला येऊ लागला की जो केवळ आर्द्र सुरांनाच देता येतो अशा परमानंदाचे आपण धनी झालो आहोत ही खूण मनात पक्की बाळगावी. जादू वाहातेपणाची. बालगंधर्वांचं गाणं हे ताना पलट्यांच्या किंवा मात्रांच्या गुणाकार भागाकारांच्या कवायती अभ्यासातून निघालेलं नव्हतं. त्यांच्या पदरी रागरागिण्यांचा फार मोठा साठाही नव्हता. होता तो गळ्यात सतत झुळझुळणारा सुरांचा वाहाता झरा. ते पाणी कुठल्याही वाहत्या पाण्यासारखे नितळ होते. भीमपलासाचा एवढासा रंगीत कवडसा पहिला की भीमपलास व्हायचे, यमनाचा पडला की यमन व्हायचे. सारी जादू होती ती नुसती ‘राग’ या संज्ञेने ओळखल्या जाणाऱ्या स्वररंगात नव्हे तर त्या वाहातेपणात. म्हणून ते गाणे साठवलेल्या भांडाराचा अहंकार मिरवीत आले नाही, त्या खानदानातले सूर झुळझुळायला लागले आणि त्यातून आपोआपच ते अभिजात संगीतातले वैभव प्रकटायला लागले. ते कधी भूपाची, कधी देसकाराची, कधी भीमपलासाची, मालकंसाची, कधी सूरमल्हाराची भरजरी वस्त्रं लेऊन उभे राहिले तर कधी लावणी संगीताचा खळाळ होऊन आले. कधी ठुमरी कजरीचा लडिवाळपणा घेऊन झुलत राहिले तर कधी स्त्रीगीतातला कौटुंबिक जिव्हाळा घेऊन आले. कधी संत काव्यातली प्रासादिकता आणि सर्वस्व समर्पणाची उत्कटता ह्यांचा असा काही संगम तिने जुळवून आणला की क्षणार्धात त्या रंगमंचाचं स्वरतीर्थ झालं. सुरलयशब्द एकरूप होऊन असा घोष व्हायचा की खुद्द तिरखॉंसाहेबांसारख्या तबलानवाजाला हाती टाळ घेऊन नाचावे असे वाटे तिथे इतरांची काय कथा ! पांडोबा बोंद्र्यांच्या मृदंगाच्या साथीस भजनी ठेक्यातल्या मात्रांच्या कमालीच्या अनोख्या लयकणांना स्पर्श करीत चालणारे ‘अवघाची संसार सुखाचा करीन’ ऐकताना ‘सुखाचिया माहेरा’ भेटण्याचा आनंद व्हायचा. नास्तिकाला आस्तिक करणारी ती भजनं, मुंबईला नाना चौकातल्या शंकरशेटच्या महादेवाच्या देवळात होणारी बालगंधर्वांची भजनं ज्यांनी ऐकली त्यांच्या अंगावर एका भजनाच्या स्मरणानं देखील रोमांच उभे राहतील. मीच गीत झालो लयकणांवर आघात न करता हलकासा स्पर्श करीत गाणे हे त्यांचे वैशिष्ट्य खरेच, पण स्पर्श हलकासा असला तरी वजनात हलकेपणा नसे. म्हणूनच त्यांच्या गाण्यात ठेक्याचे वजन सांभाळताना मी मी म्हणणाऱ्यांची दमछाक व्हायची. पण लय , सूर आणि शब्द यांचा हा असा अद्भुत त्रिवेणी संगम घडवून आणताना तो घडवला जातोय असं मात्र कधीही वाटायचं नाही. ‘आता ही लयकारी बघा’ म्हणून त्यांनी लयकारी दाखवली नाही. ते गात राहायचे आणि लयकारी होत राहायची. जुळवलेल्या तंबोऱ्याच्या तारांवरून सहज बोटं फिरली तरी षड्जपंचमच उमटावे
तशी कुठल्यातरी अज्ञात शक्तीची बोटं तथा माणसाच्या गळ्यावरून फिरतात आणि गाणं उमटतं असाच अनुभव त्यांचं गाणं ऐकताना यायचा. हे गाणं त्यांनी आधी बसवलेलं असेल, त्या भूमिकेतल्या हालचालींची, ती भूमिकेला साजून दिसणाऱ्या वेशभूषांची तालीम घेतली असेल असं कधी वाटलंच नाही. गाताना ज्या सहजतेने लयसूर पकडले जायचे त्या सहजतेने ती भूमिका ह्या कलावंताच्या देहात आणि मनात शिरपून गेलेली असायची. मला बालगंधर्व हातात नाटकाची वही घेऊन शाळकरी पोराने भूगोल पाठ कराया तसे संवाद पाठ करीत बसले आहेत हे चित्रच डोळ्यापुढे आणता येत नाही. ‘गीत तुझे गाता गाता मीच गीत झालो’ अशी कविवर्य बोरकरांची ओळ आहे. तसंच मला वाटतं ‘एकच प्याला’ची वही वाचता वाचतानाच ते सिंधू होऊन गेले असावेत.
त्या मराठी झाल्या
त्यांना देवल, खाडिलकर, बोडस ह्यांच्यासारखे अभिनयगुरू लाभले. गाण्यात गोविन्दराव टेंबे, भास्करबुवा बखले, मा. कृष्णराव ह्यांच्यासारख्या मार्गी संगीतातल्या दिग्गजांपासून ते आपल्या भावाला गाणी म्हणायला शिकवल्याच्या बहिणीच्या मायेने चाली देणाऱ्या सुंदराबाईंसारखी देशी गायनातल्या साऱ्या खुब्या जाणणारी शिक्षिका लाभली. असामान्य गुरु आणि असामान्य शिष्य. इथे सोन्याच्या आणि सोनाराच्या गुणांचे कोष्टक मांडणेही अशक्य. पण बीजाने जमिनीतून, उन्हापावसातून, नानाप्रकारचे पोषण घ्यावे पण शेवटी स्वतःच्या बीजयर्माप्रमाणे फुलावे तसे ह्या सगळ्या गुरुंकडून नाना प्रकारचे संस्कार स्वीकारून शेवटी जे फूल फुलले ते आपले स्वतःचे रंग आणि गंध घेऊनच. मार्गी आणि देशी परंपरेची सारी सौंदर्य लक्षणं असूनही स्वतंत्रपणाने फुललेलं स्वतःचं एक निराळं सांगीतिक व्यक्तिमत्व असलेलं हे गाणं होतं. मनात कसलाही पूर्वग्रह न बाळगता किंवा कुठल्याही एका गायकीचा अभिमानी न होता ज्यांनी बालगंधर्वांचं गाणं ऐकलं त्यांना अथपासून इतिपर्यंत ते गाणं बालगंधर्वांचंच वाटलं. मानापमानातल्या कितीतरी गाण्यात तत्कालीन ठुमरी कजरी गायिका गौहर जान, जोहराबाई किंवा मौज्जुद्दिनखाँ यांचा बाज आहे. पण त्या गायकीला बालगंधर्वांच्या गळ्याचा स्पर्श झाला आणि तिचं स्वरूपच बदललं. विवाहानंतर कालपरवापर्यंत माहेरचं नाव अभिमानाने लावणाऱ्या कुलकन्यका एकदम सासरच्या कुळाचा अभिमान बाळगायला लागतात आणि श्वशुरगृहातले सारे संस्कार आत्मसात करतात तशा ह्या बनारसला माहेर असणाऱ्या कजऱ्याठुमऱ्या मराठी नाटकात आल्याबरोबर मराठी लेणी मिरवू लागल्या. महाराष्ट्रात मराठी होऊन आनंदाने नांदायला लागल्या. बालगंधर्वांच्या स्वरलयीने ही जादू केली. ती देखील रंगभूमीवरच्या संगीतात मी काही निराळा बाज आणतोय ह्या अभिनिवेशाने नव्हे, कुठलंही घराणं, गाण्यावरची हुकमत हयातल काहीही सिद्ध करून कुणाचा पाडाव करावा तथा बुद्धीने ते कधीही गायले नाहीत की रंगपटात रंगले नाहीत.
“विजयासाठी माझी कविता कधीच नव्हती, म्हणून तिला भीती नव्हती पराजयाची” असं कुसुमाग्रजांनी स्वतःच्या काव्यनिर्मितीला उद्देशून म्हटलं आहे. ते बालगंधर्वांच्या नाट्य आणि संगीतविषयक भूमिकेसाठी लागू आहे. ‘मी रुक्मिणी आहे किंवा सिंधू आहे- यापुढील काही तास नाटककाराच्या मनातली ही रुक्मिणी किंवा सिंधू ती मीच हे अभिनयातून आणि अभिनयाधिष्ठित गायनातून माझ्या प्रेक्षकांना सतत पटवत ठेवण्याचं काम मला करायचं आहे/यापलीकडे दुसऱ्या कसल्याही पारितोषिकाची किंवा सन्मानाची अपेक्षा त्यांनी बाळगली नाही.
गळा तरुण होता, अधिक सतेज होता त्या काळात ज्या तन्मयतेने ते गायले त्याच तन्मयतेने वार्धक्यात गळा काम देत नसतानाही गायले. कष्ट झाले तरी गात राहिले. त्या गाण्याला खंड नव्हता. वृद्धावस्थेतही गळ्यातून अशी एखादी स्वरावली निघून जायची की श्रोत्यांना तेवढ्यानी भरून पावलो असं वाटावं. भारतीय संगीतात आवाज जवान आहे की वृद्ध आहे हा प्रश्न नसतो. गळ्यातून निघणारा बनी सुराला पूर्णपणाने चिकटून प्रकट होतो की नाही, ह्याला महत्व असतं. आवाज कमावणे आणि सुरेलपणा असणे ह्या दोन गोष्टी अगदी निराळ्या आहेत.
ऑडिटची गरजच नव्हती.
बालगंधर्वांच्या आवाजाच्या धर्माचे वर्णन करण्याचा अनेकांनी प्रयत्न केला. तो मधुर होता, त्याला जव्हार होती, हे खरेच. पण त्या आवाजाला आणखी एक गुणधर्म होता. संगीतरत्नाकरात उत्तम गायकाची लक्षणं सांगितली आहेत. हृद्यशब्दः सुशारीरो ग्रहमोक्षविचक्षणः – इ.इ. बावीस गुण आहेत. ही यादी बालगंधर्वांचे गायन ऐकून केली गेली की काय अशी शंका यावी इतके त्यातले गुण बालगंधर्वांच्या गायनाशी जुळतात. त्यात एक सुशारीर नावाचा गुण आहे. ‘सुशारीर’ म्हणजे ज्याच्या आवाजात अभ्यासावाचून रागाचं स्वरूप व्यक्त करण्याचा धर्म आहे असा. अभ्यासावाचून म्हणजे उपजत. सुरांच्या त्या सम्राटाला रागांच्या आरोह अवरोहाची सरगम करता येत नव्हती. आणि तालाच्या ह्या बादशहाला ठेक्याचे साधे बोलही ठाऊक नव्हते. जन्मोजन्मीच्या ऋणानुबंधांसारखे नाना ताल आणि नाना राग त्यांच्या गळयातच येऊन पडायचे आणि त्यांचे होउन जायचे. त्यांचे वादीसंवादी सूर कुठले नि तालाच्या मात्रांची संख्या काय ह्यांचे ऑडिट काढून बसायची गरज नव्हती. याचा अर्थ त्यांनी गुरूकडून मिळणाऱ्या शिक्षणाला कमी लेखलं असा नाही पण गुरुने दिलेल्या स्वरवैभवातलं आपल्या गळ्याला साजून जे दिसेल ते निवडण्याची त्यांना उत्तम उपजत बुद्धी होती. गुरुशिष्यसंबंधात भक्तीला असल्या विलक्षण बुद्धीची फार आवश्यकता असते. एरवी परंपरा चालू ठेवणे म्हणजे गुरुचे आआंधळे अनुकरण करीत राहाणे एवढाच अर्थ होईल. देवल आणि खाडिलकर हे दोघेही नाटककार उत्तम तालीम देत. पण खाडिलकरांची तालीम आपल्याला अधिक महत्वाची वाटली असल्याचे त्यांनी रेडिओवरच्या एका मुलाखतीत सांगितलेलं आहे. सकाळी दहा ते संध्याकाळी सहापर्यंत दुपारची तासाभराची सुट्टी सोडली तर अखंड तालीम चालायची. पण स्त्रीसुलभ शृंगारिक विश्वम सर्व नाटकमंडळीपुढे शिकवताना काकासाहेबांना संकोच वाटायचा. म्हणून रात्री दहानंतर मुंबईच्या चौपाटीवर ते बालगंधर्वांना खास तालीम देत. पाउणशे वर्षांपूर्वीच्या मुंबईत रात्री नवानन्तर चौपाटीवर सारं काही चिडीचूप असे. नाहीतर बालगंधर्वांची तिथे तालीम चालते म्हटल्यावर सगळी मुंबई नसली तरी सगळे गिरगाव निश्चित तिथे लोटलं असतं. ह्या तालमींनी आपल्याला शब्दाशब्दातल्या अर्चाच्या छटांची काकासाहेबानी जाण कशी आणून दिली हे बालगंधर्वांनी जाहीरपणाने सांगितलेलं आहे.
स्वभावधर्माशी इमान
गुरुभक्ती आंधळी नव्हती म्हणून भास्करबुवा- सारख्यांचं मोठं गाणं त्यांनी नाट्याला पोषक असं त्याला रूप देऊन मांडलं. ते रागदारी संगीत असलं तरी रंगमंचावर ख्याल गायकीसारखं रागविस्तारासाठी गायचं नसून रागाच्या मयदित राहून त्या पदातला भाव प्रेक्षकांपुढे सुरांनी औजारीत गोजारीत न्यायला हवा हे भान त्यांनी सुटू दिलं नाही. म्हणून ते गायनातल्या आतिषबाजीला भुलले नाहीत. त्यांनी नाटकाच्या रंगमंचावरून सुराचे भुईनळे फोडले नाहीत. त्या भुईनळ्यांना आणि आकाशात ते फुटल्यावर खाली सांडताना दिसणाऱ्या रंगीबेरंगी अग्निफुलांच्या वर्षावाला आणि त्या शोभेलाही महत्त्व आहे. भूगंधर्व रहिमत खाँसाहेबांची तान तशी भुइनळ्यासारखी फुटत असे असं म्हणतात. गंगावतरणासारखी ती अतितार सप्तकातून अतिमंद षड्जापर्यंत अवतरत असे अशी आख्यायिका आहे. पण रंगमंचावरचं गाणं बालगंधर्व नावाचा मेहबूबखाँ, भास्करबुवा, गोविन्दराव यांची तालीम लाभलेला गायक गात नसून सिंधू, रुक्मिणी, सुभद्रा अशा नायिका गाताहेत हे अवधान राखून ते गायले. म्हणून ते गाणं त्या नायिकांच्या स्वभावधर्माशी इमान ठेवून गायलं गेलं. रागविद्येशी नव्हे. इतकंच नव्हे तर प्रणयक्रीडेच्या प्रसंगी सहज सुटलेल्या केसांच्या बटेसारखं सहज सुटलेल्या रागांच्या पट्ट स्वरबांधणीचं भानही त्यांच्या स्वरक्क्रीडेच्या प्रसंगी सहज सुटल्यासारखं वाटायचं , अतिसहजतेने वज्ज्यस्वरांचाही उपयोग करून ते गाणं त्यांनी अधिक मोहक केलं.
हे कौशल्य सुरांच्या सौदर्यगुणांची उत्तम समज असल्याशिवाय होत नाही. ‘ मम आत्मा गमला ‘ गाताना अंतऱ्यात ‘ जीव कसा वश झाला ‘ म्हणताना त्या बिहागाला कोमल निषादाचा त्यांनी स्पर्श केल्याबरोबर खुद अलादियाखौँसाहेब बिहागाला अनपेक्षित रीतीने लाभलेल्या त्या अनोख्या लेण्याने प्रभावित झाले होते. कोमल निषादाचा हा प्रयोग जीव वश होऊन दुजा भाव नुरल्याचा अभिनय करताना किती परिणामकारक ठरायचा हे ज्यांनी बालगंधर्वांची रुक्मिणी पाहिली असेल त्यांना आजही आठवेल .
मनावर गुलाबपाण्याचं शिंपण केल्याचा आनंद देणाऱ्या अशा असंख्य क्षणांचं स्मरण बालगंधर्व हयात असताना आणि आजवर अनेकांना होतच राहिलं आहे. मी सुरवातीला म्हटल्याप्रमाणे हा संपणारा विषय नव्हे. यंदाच्या ह्या जन्मशताब्दीच्या निमित्ताने पुन्हा एकदा असंख्य रसिक मनं त्यांच्या स्मरणानं फुलून येतील. त्यातली बहुतेक मंडळी जीवननाटकाच्या भरतवाक्याजवळ पोहोचलेली आहेत. पण हे स्मरण त्यांना देखील आपल्या जीवनाला अंक पहिला प्रवेश पहिला सुरु झाल्यासारखं वाटेल. त्यांची मनं ह्या आनंदाच्या पसा पसा भरून घातलेल्या दानाच्या स्मरणाने सद्गदित होतील. अशा किती सांगू आणि किती नको ह्या भावनेने उचंबळून आलेल्या गंधर्वप्रेमी रसिकांचं महाराष्ट्र टाइम्सच्या ह्या बालगंधर्व जन्मशताब्दी विशेषांकात जणू एक संमेलनच भरलेलं आहे. केवळ महाराष्ट्रातल्याच नव्हे तर महाराष्ट्राबाहेरच्या तामीळ, तेलगू, कन्नड, गुजराती रसिकांनी कमालीच्या आत्मीयतेने बालगंधर्वांचं स्मरण केलेलं आहे. रेडियो किंवा टेलिव्हिजन नसलेल्या काळात हा अद्भुत कलावंत आपल्या सुरांनी भाषा – प्रांत यासारखी बंधनं ओलांडून किती दूरवर पोहोचला होता हे पाहून आश्चर्य वाटतं आणि मराठी असल्यामुळे अभिमानहीं वाटतो.
सत्यवदे बजाना
मला एक प्रसंग आठवतो. पंधरावीस वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. हैदाबादला माझ्या एका नाट्यप्रेमी तेलगू मित्राच्या बंगल्याच्या गच्चीवर चांदण्या रात्री गप्पागोष्टीची एक मैफल जमली होती. बहुतेक मंडळी नाटक, गाणं , वाजवणं ह्यातली होती . तेवढ्यात कुणी तरी मला पेटीवर मराठी नाटकातलं एखादं पद वाजवण्याची फर्माइश केली. मी काय वाजवावे हथा विचारात पट्टयांवर बोटांची चाळवाचाळव सुरु केली . मिश्रपिलुच्या अंगाने एक दोन जागा पेटीवर निघाल्या आणि त्या गच्चीच्या कोपऱ्यातून आवाज आला- ” अय्योव्यो बालगंधर्वा SS ! ” एवढ्यावरच प्रकरण बांबले नाही. एक गौरापान , काळेभोर कुरळे केस असलेला , देखणा गृहस्थ अंगावर रेशमी अब्बा , पांढरे शुभ्र घोतर नेसलेला तिथून उठून सरळ माझ्यापर्यंत चालत आला आणि समोर बसून चक्क आपले दोन्ही हात माझ्यापुढे केले आणि माझे हात हातात घेऊन स्वतःच्या कपाळाला लावून म्हणाला ” बाबुजी ss यह बालगंधर्व का गाना आपके उंगलीमें आके बैठा है ! …. सत्यवदे बजाना ” सत्यवदे हे माझंही आवडतं गाणं , मी वाजवायला सुरवात केली . अबुनीरवाहे डोळा अशा अवस्थेत तो गृहस्थ समोर बसून कुठे तरी पार हरवल्यासारखा ते ऐकत होता . हे अद्भुत घडताना पाहून आमचे इतर तेलगू मित्रही चकित झाले होते . हा तेलगू रंगभूमीवरचा आणि त्यानंतर शेकडो तेलगू बोलपटातला श्रेष्ठ गायकनट रघुरामय्या . त्यानंतरची ती मैफिल म्हणजे मी बालगंधर्वांची आठवतील ती गाणी पेटीवर वाजवीत होतो , जमतील तशी गात होतो आणि त्यातल्या प्रत्येक गाण्याचं तेलगू भाषेतलं रुपान्तर बालगंधर्वांच्या गायनाच्या डंगाने , त्यातल्या गानसौंदर्यातली जागा न् जागा दाखवीत रघुरामय्या गात होते . कर्नाटक संगीताचा वापर असलेल्या तेलगू रंगभूमीवर हथा बालगंधर्वांच्या एकलव्यासारखी विद्या मिळवलेल्या शिष्याने सारी बालगंधर्व गायकी नेऊन असंख्य लोकांची मने जिंकली होती .
रघुरामय्या चरणरज
पस्तिशी चाळिशीतला वाटावा असा हा रसरशित माणूस मला भेटला त्यावेळी सत्तरीत शिरला होता . एक केस पिकला नव्हता चेहऱ्यावर एक सुरकुती नव्हती . त्यानंतर पुढचे आठ दिवस मला एखाद्या लहान मुलासारखा परून होता . विषय फक्त बालगंधर्व , बालगंधर्वांसारखाच लहानपणी रंगभूमीवर आला . नवव्या दहाव्या वर्षापासून गायला लागला . एका नाटक कंपनीवाल्याने ह्याच्या शेतकरी बापाला जमिनीचा लहानसा तुकडा देऊन हा मुलगा विकत घेतला . कंपनीच्या भ्रमंतीत कुठल्याश्या गावी नाटकात चांगलं काम केल्याबद्दल तिथल्या सावकाराने ” हे गाणे गात जा ” म्हणून ह्या बालनटाला बालगंधर्वांची रेकॉर्ड दिली . ती ‘ सत्यवदे’ची . रघुरामय्यांच्या भाषेत सांगायचं म्हणजे ‘ वह यकच प्याला में सुधाकर जैसा पहिले पियालेमे शराबी बन गया वैसा येक सत्यवदेकी रेकॉर्डने हमको बालगंधर्वका चरणरज बना दिया.” रघुरामय्यांचा तो ‘चरणरज’ आजही माझ्या कानांत आहे. अशा रघुरामय्यांना आम्ही बालगंधर्वस्पर्धेची पारितोषिकं द्यायला प्रमुख पाहुणे म्हणून पुण्याला बोलावलं होतं. त्यांनी आपल्या भाषणाला सुरुवात केली तीच मुळी ‘हमने बालगंधर्वका उच्छिष्ट खाते खाते जिंदगी बितायी’ ह्या वाक्याने. समोर श्रोत्यांत भीमसेन होते, हिराबाई होत्या, वसंतराव देशपांडे होते. गंधर्वप्रेमी रसिकांनी हॉल खचाखच भरला होता. आमच्या आग्रहावरून ह्या तेलगू भाषिक नटाने ‘मूर्तिमंत भीती उभी’ म्हटले. शंभर टक्के बालगंधर्वांचे स्मरण करून देणाऱ्या त्यांच्या गाण्याला साऱ्या सभेने डोळ्यातून वाहणाऱ्या अश्रूंनी दाद दिली. ते एक अद्भुत दृश्य होते. गंधर्व गायकी त्यांच्या रंधारंधात भिनली होती. ती त्यांनी आत्मसात केली होती. केवळ भक्तिभावाने. रघुरामय्यांनाही सरगम वगैरे शास्त्रात अजिबात गम्य नव्हते.
गायनाचे फूल
रघुरामय्यांसारखे मराठी प्रांताबाहेरचे कितीतरी श्रेष्ठ कलावंत आणि रसिक ह्या शंभराव्या वाढदिवसाची भेट म्हणून त्यांच्या स्मृतिपेठेत जपून ठेवलेल्या बालगंधर्वांच्या आठवणी घेऊन आलेले आहेत. साहित्य संगीत नाट्य ह्या क्षेत्रात असामान्य ठरलेल्या हरीन्द्रनाथ चट्टोपाध्यायांनी बालगंधर्वांच्या स्त्री भूमिकेतल्या यशाचं रहस्य कसं छान सांगितलंय. ते म्हणतात “त्यांच्यात एक स्त्री दडलेली होती. मेकपला बसले की ती स्त्री मोहरून येई… बाकीचे स्त्रीपार्टी हे स्वी-पार्टीच राहिले. गंधर्व हे स्त्रीमनाचे निरुपक झाले.” हरीन्द्रनाथांनी गंधर्वांच्या स्त्री भूमिकेशी तादात्म्य पावण्याच्या गुणाचं रहस्य शोधायचा प्रयत्न केला तर कुमार गंधर्वांनी त्यांच्या गाण्यातली अपूर्वता दाखवताना म्हटलंय “त्यांच्या गाण्यातली अपूर्वता ही होती की आवाजाच्या कलेच्या दुनियेत ‘आवाज’ (आघात) न करता ते प्रत्येक गोष्ट करत … नारायणरावांचं वैशिष्ट्य हे की ते आपलं गाणं फुलासारखं श्रोत्यांपुढे ठेवीत.”
मला कुमारजींचा गायनाचे फूल श्रोत्यांपुढे ठेवायचा दृष्टान्त खूप आवडला. आणि असं वाटलं की ह्या अंकातले सारे लेखही निरनिराळ्या क्षेत्रातल्या आणि प्रांतातल्या लेखकांनी बालगंधर्वांच्या शंभराव्या वाढदिवसाची भेट म्हणून फूल आणून द्यावे अशा हळुवारपणानेच कागदावर उतरवले आहेत. कॉ. डांग्यांसारखा सारे जीवन कामगारांच्या लढ्यांच्या रणभूमीवर घालवलेला योद्धाही बालगंधर्वांच्या स्मरणाने चित्ताला हळुवारपणा आणून ‘गंधर्वप्रेमी’ हे बिरुद एकेकाळी आपण मानाने कसे मिरवीत होतो हे सांगताना इथे दिसतो आहे. डांग्यांच्या ह्या स्मरणकथेतून बालगंधर्वांचं तर दर्शन घडतंच, पण “इन्किलाब झिंदाबाद’, ‘क्रांती चिरायू होवो’चे नारे देणारे डांगे तुरुंगात ‘दया छाया ये’ सारखी गाणी गुणगुणत होते हे वाचून अधिक जवळचे वाटायला लागतात.
लाखमोलाची भावना
बालगंधर्वांचे हे एक वैशिष्ट्य होते. त्यांच्या आवाजातले आर्जव गद्य असो की गाणे असो. एकदम काळजालाच हात घालायचे. ज्या रागात गात असतील तो रागच भाषा होऊन श्रोत्यांशी संवाद साधायचा. नटकटाले संवाद घडत राहते तसे ते स्वरसंवाद मनात रुंजी घालायला लागायचे. मग आपल्याला गाणे
यावे की न येते. ते गाणे मुखस्वादे उच्चारायचेच. घराघर ह्या गाण्यांच्या फेऱ्या ब्रह्मधायच्या. मग गाण्याला आवाज असो वा नसो. संगीतातल्या क्षेत्रात बालगंधर्वांच्या समकाल मोकळी देण्याठी झुरणे म्हणजे तंत्रे आणि आरत्या ह्या पलिकडे न जाणारे अनेक मराठी कुटुंबांच्या कुटुंब बालगंधर्वांनी ‘गाती’ केली. जिथून ‘नारी अंजनी सुत रामदूतप्रभंजन’ एकू वाटून तिथून ‘नटर कृष्णा समान’, ‘स्कूलत तुझस सूनाळ बक’ एकू यायचं. मग आपण आणि नाही मी बोलत आहे बाई! असा आनंद घ्यायचा. गाणे हा नायिकांच्या तोंड ‘कवितेला गाणे पावित्रात’ अशी हाम समजली होती. गायकर कडक आवाजात गाणे मुकर केले, जुळूक काळजी पक्कज नव्हे तर एखादी कविज्ञ असलेल्या मराठी भावगायिकांच्या संसाराच्या धाकधसास पोत चांगल झुळझुळीत केला.
ह्या शतकाच्या सुरूताली बालगंधर्वांच्या अभिनयामुळे अनेक जोड्यांना विनय न सोडता सुभलिलास मोहक विषम कसे असतात याचे जणू का सर्टिफिकेट मिळाले. वर्षानुवर्षे न बदललेले वेषभूषा बदलली. केशभूषा बदलली. अलंकार बदलले. ह्या विशेषाकाळात श्री. वेळकांच्या लोळता वेषभूषेविषयी बालगंधर्वांच्या कसता का असे ह्याचा फार मार्मिक तूतान आहे. मला बालगंधर्वांच्या त्या मोहक आणि एककाळात खूप महान अशा वेषभूषेच्या हेसोंगास असलेली भावना आणि गोतीची ऐतिहासिक भूमिका आणि त्यजत्नादनिंदगतेमुळे हे अभिनयाच्या उंबरठे राहत या देवलती सुरूताली घुमायसकरत्या शब्दाच्या ‘भारतव्यापी’ भांडगोरांच्या प्रेमन करावी ही ती लाख मोलाची भावना!
ते प्रेक्षकांना ‘अन्नदाता मायबाप’ म्हणायचे. मग ते खाजगी संभाषण असो की जाहीर भाषण असो. पुस्कळता ही लाचारी तुरी वाटायची. आई-वडिलांच्या चरणी मस्तक ठेवणे ही जर लाचारी असेल तर बालगंधर्वांनी प्रेक्षकांना ‘मायबाप’ म्हणणे ही लाचारी म्हणायला हवी. ज्या मुळे आपल्या रंगभूमीच्या जगात अस्तित्व सिद्ध झाले त्या प्रेक्षक अनंददाता आईवडिलांच्या जागी दिसता तर त्यात काय चूक आहे?
नाटक ही एक अशी कला आहे की ती प्रेक्षकांशिवाय सिद्ध होत नाही. स्वतः सुखाचा गात येते, रंग काटता येते, लिहिता येते पण अभिनय हा रिकामा प्रेक्षकाशिवाय शक्य नाही. ह्या साऱ्या प्रमाणे प्रेक्षकांची ओसरे जाताना पहावे. रंगभूमीला प्रेक्षकाचा आलेल असते. ती संख्या ओसारते जाते याची नक्की कारणे सांगणे शक्य नाही. नाना कारणांनी लोकाशिकती बदलते. आपण काळ बदलत म्हणतो. वास्तवात बदलत माणस. त्याला अनेक कारणे असतात. शंभ वषापूर्वी समाज, आर्थिक, सांस्कृतिक, राजकीय परिस्थिती, लोकांच्या प्रत्येक बाबतीतिल आवडिवेडी. नीति-अनीति विचाक करन्यात जमीन असमानचा फरक पडला. ह्या बदलाचे पहिले पक्के लोकशिकती कळवतात बतवतात ह्या बदलाला अंज येई येई असे कळवून टाकून चालणार नाही. नटनाट्यकसाच्या रूपिनी कलावंतात हा धीपायूने उगम सूप असतो. एका संमुलखात लोकाशिकतीला टाळकाड्याचा कडकडाट फवाऱ्यावरच्या लिंबासारखं अलगद झेललेलं असतं. देहभान हरपून त्याची नाना प्रकारची रूपं पाहिलेली असतात. ती रूपं नटाच्या मनातही नाचत असतात. प्रेक्षकांनी अव्हेरलं तरी ती रूपं रंगमंचावर येण्यासाठी आतल्या आत थैमान घालत असतात. आत्मा आतुर असतो. पण देह दुबळा झालेला असतो. देहाच्या अशा दुबळ्या अवस्थेत ज्यांनी बालगंधर्वांचा अभिनय पाहिला, गाणी ऐकली त्यापैकी ज्यांना त्या भग्नशिल्पातल्या तुटून पडलेल्या स्थानातल्या पोकळ्या स्मरणाने भरून काढता आल्या त्यांना त्या वृद्ध नारायणरावांच्यातला बालगंधर्व दिसला. असा हा बालगंधर्व त्यांच्या गाण्यात नेमका कुठे होता हयाचं विवरण डॉ. शरत्त्वंद गोखले यांनी ह्या अंकात फार मार्मिक रीतीने केले आहे. गाळ्या व्यासंगाला रसिकत्वाचा अमृतस्पर्श झालेला असला म्हणजे विवरण- सुद्धा गाण्याच्या मैफिलीसारखे कसे होते याचं डॉ. गोखल्यांचा लेख हे एक सुंदर उदाहरण आहे.